*मानकी सोसायटीची निवडणूक बिनविरोध* *अध्यक्षपदी तुळशिदास नागपुरे तर उपाध्यक्षपदी मोहन खिरेकर* *गाव विकासासाठी भाजप, शिवसेना व कॉंग्रेस एकत्र*

वणी : परशुराम पोटे

तालुक्यातील मौजे माणकी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर संचालक मंडळातुन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी एक एकच फार्म दाखल झाल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचीही निवड बिनविरोध झाली. यावेळी अध्यक्षपदी तुळशीदास नागपुरे तर उपाध्यक्षपदी मोहन खिरेकर विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.  निवडणूक निर्णय अधिकारी निकुडे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
 कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद वासेकर व भाजपाचे तालुका सरचिटणीस तथा सरपंच कैलास पिपराडे व शिवसेनेचे उमेश सावरकर यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडलेल्या सोसायटीच्या संचालकपदी
प्रमोद वासेकर,भवानी मांदाडे, विनोद वैद्य, बापुराव सरवर, विजय खुसपुरे, राजु काकडे, संजय वाघमारे, शंकर नागपुरे, मधुकर कनाके, पुष्पा जुनगरी, मनिषा माहुरे, यांची निवड करण्यात आली. 
हि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पं.स.सभापती व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, ग्रा.पं.सदस्य नानाजी पारखी, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष महादेवराव चिडे, नागोजी बोर्डे,दादाजी मालेकर, उपसरंपच शंकर माहुरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार परशुराम पोटे,विक्रम वैद्य, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
 विशेष म्हणजे नुकतीच पार पडलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कॉंग्रेच, शिवसेना व भाजप हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post