*चुडावा येथे हिवताप जनजागृती कार्यक्रम संपन्न.*


नागरिकांना घराजवळील परिसर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान.

चुडावा:-
        डॉ.व्ही.आर.पाटील,जिल्हा हिवताप अधिकारी,जिल्हा हिवताप कार्यालय परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रा.आ.केंद्र- कावलगाव,उपकेंद्र-चुडावा च्या वतीने जि.प.प्रशाला चुडावा येथे हिवताप जनजागृती कार्यक्रम दि.०६/०४/२०२२ ला पार पडला.कार्यक्रमाला मुख्याध्यापक टेकले सर, डॉ.गोपछडे CHO, डॉ.मनोहरे मॅडम CHO,श्री. टी. एस. इनामदार आरोग्य सहाय्यक, श्रीमती.एल.के.कासार आरोग्य सेविका,श्री. एम.आर.वाटगुरे आरोग्य सेवक,आशा वर्कर, शिक्षक, आणि शाळेतील विद्यार्थी,गावातील नागरिक आदी उपस्थित होते.
             यावेळी श्री.एम.आर.वाटगुरे आरोग्य सेवक यांनी हिवतापाची हिवताप प्रसारक डास ह्याविषयी सखोल माहिती दिली. हिवतापाची लक्षणे,हिवतापावर जनतेनी करावयाचे उपाययोजना तसेच किटकजन्य आजारे हिवताप, हत्तीरोग, जे.ई, चिकणगुण्या, डेंग्यू,चंडीपुरा याविषयी माहिती दिली. आजारांची लक्षणे, आजारांवर उपचार,आणि डासांची उत्पत्तीस्थाने,ह्याविषयी सखोल माहिती देण्यात आली.डास नियंत्रनासाठी जनतेनी करावयाच्या उपाययोजना, प्रतिबंधात्मक उपाय,गप्पी मासे,मच्छरदाणी चा वापर,धूर फवारणी,कोरडा दिवस पाळणे,महत्वाचे संदेश, घोषवाक्य सांगण्यात आले.
       सकाळी गावात किटकशास्त्रीय सर्वेक्षण व अबेटिंग करण्यात आली.गावात हिवताप जनजागृती रॅली काढण्यात आली.गावातील नागरिकांना घराजवळील परिसर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान करण्यात आले.अश्याप्रकारे चुडावा गावात हिवताप जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post