गडचिरोली येथील सरकारी दवाखान्यात कॉम्प्युटर चोरांना झाली अटक...

गडचिरोली : शहरातील कॉम्प्लेक्स येथील सामान्य रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटर चे दार तोडून कॉम्पुटर चोरी झाल्याची घटना काल सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.

भरदिवसा ट्रॉमा केअर सेंटर चे दार तोडून कॉम्पुटर नेत असताना दोन युवकांना सामान्य रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आणि सफाई कामगारांनी रंगेहाथ पकडले. आरोपी जागेवरच सापडून आल्याने, सुरक्षा रक्षका मार्फत ताबडतोब पोलिस ठाण्यात सूचना देण्यात आली होती. लगेच पोलिस यंत्रणा घटनास्थळी येऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. दोन्ही आरोपी विरूध्द अपराध क्रमांक 245/2022 नुसार भादवी कलम 380, 511 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांचे
मार्गदर्शनात, सहाय्यक फौजदार सुनील बेसरकर, यांचे सह पोहवा रमेश उसेंडी हे करीत आहेत.
लोकांनी गजबजलेल्या ठिकाणी भर दिवसा चोरी झाल्याची घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post