माझ्यावर रोज वीस ते पंचवीस जण बलात्कार.... आई वडिलाची साथ ...

बिहार:- एक अत्यंत खळबळजनक घटना बिहारच्या समस्तीपूर येथे उघडकीला आलेली असून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. त्यातील एका अल्पवयीन मुलीने तिचे आई-वडील आणि काकांवर अत्यंत गंभीर आरोप केले असून पैशासाठी माझे कुटुंबीय मला माझ्यावर बलात्कार करण्यासाठी व्यक्ती शोधत असून त्यांनी माझा अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे असा आरोप या अल्पवयीन मुलीने केला आहे. व्हिडिओमध्ये ती पोलीस ठाण्याचे एस आय आणि गावचे सरपंच यांनी देखील आपल्यावर अनेकदा अत्याचार केले आहेत असे देखील सांगत हा सर्व प्रकार आई वडिलांच्या समोर झालेला आहे असे देखील ती म्हणते.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती माझ्यावर रोज वीस ते पंचवीस जण बलात्कार करत आहेत अशी देखील स्वतःची व्यथा मांडत आहे. माझी आई ही घरातून दारू विकत असून जवळच्या पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचारी घरी येतात आणि तिच्यावर बलात्कार करतात. मी अतिशय असहाय्य असून कोणीही माझी मदत करत नाही कृपया कोणीतरी मला मदत करा नाहीतर हे लोक मला मारून टाकतील, असे देखील ती म्हणते.



सदर व्हिडिओ मध्ये ती स्वतःचा पत्ता देखील सांगत असून माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात मी पोलीस ठाण्यात अद्याप पर्यंत तक्रार केलेली नाही कारण एसआय असलेले मनोज सिंह हे माझ्यावर अत्याचार करतात असेही ते पुढे म्हणते. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिचे आई-वडील आणि एका तरुणाला अटक केली आहे.

पीडित मुलीचे वडील यांचा इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा व्यवसाय असून आई पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर एकदा कारवाई झाली होती मात्र पैसे घेऊन पोलिसांनी प्रकरण दाबून टाकले. वडिलांनी देखील माझ्यावर अत्याचार केले असे तिचे म्हणणे असून सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती डीसीपी सहियार अक्तर यांना समजली होती आणि त्यानंतर कारवाईला वेग आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post