बातमीदाराला मज्जाव करण्याचे प्रकरण भोवले अ. जा./ज. प्रतिबंधात्मक कायद्यान्वे गुन्हा


 विसापूर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पार पडलेल्या कार्यक्रमांचे वृत्त संकलन करण्यासाठी एका अग्रणी वृत्तपत्राचे वार्ताहर जि. प. प्राथमिक शाळेत वृतांकनासाठी गेले. त्यावेळी जि. प. प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षांनी मज्जाव करून वार्ताहराला मारहाण केली. या प्रकरणाची बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी अमोल शंकर खनके व त्याचा साथीदार यांच्यावर भादंविच्या कलम २९४, ३२३, ५०६ व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ३ (१) आर, ३ (१) एस. अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील दैनिक वर्तमान पत्राचे फिर्यादी बातमीदार म्हणून काम करतात. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम पार पडला. याच दिवशीनिकाल देखील जाहीर करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक धनराज दुर्गे यांनी सदर वार्ताहराला सन्मानाने बसविले. यावरून जि. प. प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अमोल खनके व प्रीतम पाटणकर यांनी फिर्यादीसोबत हुज्जत घालून मज्जाव केला. मारहाण केली. याप्रकरणी फिर्यादीने बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. अधिक तपास बल्लारपूर पोलिस करीत आहे.

अमोल खनके यांचा पाल्य चालू शैक्षणिक सत्रात नाही. मागील वर्षी त्याचा पाल्य शाळेत असल्याने शाळा व्यवस्थापन समितीचे ते अध्यक्ष होते. परंतु ते नेहमी शाळेत येत होते. महाराष्ट्र दिनी घडलेला प्रकार दुर्दैवी होता. माझ्या समक्ष त्या वार्ताहरावर त्यांनी हात उगारून भांडण केले. आम्हाला गावातील प्रत्येकांचे सहकार्य अपेक्षित आहे.

- धनराज दुर्गे, मुख्याध्यापक जि. प. प्रा. शाळा, वस्ती विभाग विसापूर.




Post a Comment

Previous Post Next Post