खोटे दस्तावेज सादर करून २ लाख ११ हजारांची अफरातफर करणाऱ्या ग्रामसेवकाकडून पैसे वसूल करा


वडेगाव येथील ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

कुरखेडा - पंचायत समिती कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत वडेगाव येथे ग्रामसेवक मुरलीधर मेश्राम यांनी खोटे दस्तावेज सादर करून २ लाख ११ हजार रुपयांची अफरातफर करून ग्रामस्थांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे वडेगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हा अधिकारी संजय मीना यांच्याकडे लेखी तक्रार करून ग्रामसेवकाकडून पैसे वसुल करण्याची मागणी केली. जोपर्यंत ग्रामसेवक मुरलीधर मेश्राम यांच्याकडून पैसे वसूल केल्या जात नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीला कोणताच कर दिला जाणार नाही असा गंभीर इशारा ग्रामसभेने दिला आहे.

ग्रामपंचायत वडेगाव येथे ग्रामसभेचा ठराव न घेता ग्रामसेवक मेश्राम व तत्कालीन सरपंच संजय कोरेटी यांनी संगणमत करून श्रीराम विजय झवर यांच्या नावे माती पुरवणे बाबत ८३ हजार ८०९ रुपये तथा ५२ हजार दोनशे रूपयांचा मुरूम टाकल्याचे कागदोपत्री खर्च दाखविला आहे
 माती व मुरूम दबाई केल्याचे १७ हजार ५६ रुपये खर्च दाखविण्यात आला. श्रीराम माती पुरवणी बाबत बत्तीस हजार रुपये खर्च नोंदवला आहे. मातीचे ड्रेसिंग करणे या बाबीवर २२०० रुपयाचा खर्च नोंद केली आहे. मात्र प्रत्यक्ष काम झालाच नसल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. ग्रामसभेमध्ये प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून ग्रामसेवक मुरलीधर मेश्राम तसेच तत्कालीन सरपंच संजय कोरेटी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा रक्कम वसूल होईपर्यंत कोणत्या प्रकारचा कर ग्रामपंचायतीला भरल्या जाणार नाही असा गंभीर इशारा ग्रामसभेने दिला आहे. यावेळी गावातील तंटामुक्त गांव समितीचे अध्यक्ष यशवंत सुकारे, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर शेडमाके, वसंता बारई, प्रेमानंद भैसारे, युवराज शेंडे, भाग्यवान मेश्राम, दामोधर दुमाणे, त्र्यंबक ओरासे, देवानंद बारई, धर्मेंद्र दुमाने व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post