गणेशोत्सवापूर्वी प्रभाग १९ मध्ये तातडीने धुरीकरण अभियान राबवा सुनिता हांडेपाटील यांची मागणी

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई : गणेशोत्सवापूर्वी महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसरात तातडीने सार्वजनिक ठिकाणी, गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत व बाहेरील परिसरात डासांचा उद्रेक संपुष्ठात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबविण्याची लेखी मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. 
महापालिका प्रभाग १९ मध्ये कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात डासांचा उद्रेक वाढल्याने स्थानिक परिसरातील रहीवाशी त्रस्त झाले आहेत. डासांमुळे साथीच्या आजाराचे रुग्णही वाढीस लागले आहेत. गणेशोत्सव आता तीन दिवसावर आलेला आहे. त्यामुळे संबंधितांना प्रभाग १९ मधील कोपरखैराणे सेक्टर १४, १५, १६, २२, २३, १७ व अन्य परिसरात तातडीने धुरीकरण अभियान राबविण्याचे निर्देश देवून संबंधितांना दिलासा देण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post