युवकाने घरात घुसून केला महिलेचा विनयभंग..

पळसगाव (पिपर्डा) : चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या काजळसर येथे एका महिलेला घरात एकटीच स्वयंपाक खोलीत झोपून असल्याचे बघून युवकाने घरात शिरून महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी महिलेने चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करताच आरोपीवर गुन्हा दाखल केला. ही घटना शुक्रवारी घडली.

काजळसर येथील आरोपी प्रशांत मनोहर सोनवाने (३५) याने गावातील एका महिलेला घरात ती एकटीच असल्याचे बघून प्रवेश केला. स्वयंपाक खोलीत ती झोपली असताना त्याने तिचा विनयभंग केला. यावेळी पीडित महिलेने आरोपीच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपी प्रशांतने तिला धक्का देऊन पाडण्याचा प्रयत्न केला. ती सरळ समोरच्या भिंतीवर आदळल्यामुळे तिच्या पायाला दुखापत झाली . आणि याच संधीचा फायदा घेऊन आरोपी बाहेर पळाला. रात्र असल्याने महिलेने दुसऱ्या दिवशी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ महिलेच्या तक्रारीवरून आरोपीवर कलम ४५२, ३५४, ३२३ भादंवि सहकलम ३ (१) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगोळे, पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी घटनास्थळी भेट दिली.

Post a Comment

Previous Post Next Post