आयुष्यभराचे संबंध खराब करते ती म्हणजे उधारी...


विशेष लेख हर्ष साखरे मुख्य संपादक

आपले हक्काचे पैसे भिकारी बनून मागावे लागतात आणि उधार घेणारा मात्र शेठ बनून तारखेवर तारीख देत असतो...


आज प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवसायामध्ये व्यापारी वर्ग ग्राहकांनी उधारी देत असतो उधारी देण्याचा कारण असे असते की प्रत्येक कस्टमरला कधी कधी आर्थिक अडचण निर्माण होत असते परंतु त्याचा फायदा घेणारे अनेक ग्राहक आहेत. असा कोणताही व्यवसाय नाही की त्यामध्ये अनेक ग्राहकांनी व्यापाऱ्याचे पैसे बुडवीलेले आहेत.



शहरी भागात ,ग्रामीण भागात विश्वासावर व्यापारी ग्राहकाला वस्तू देत असतो की समोर आपल्याला उधारी दिलेल्या वस्तूची पैसे भविष्यामध्ये मिळणार या आशेवरती व्यापारी सुद्धा ग्राहकाला उधारी सामान देतो परंतु अशा अनेक घटना घडल्या आहेत की व्यापारी जेव्हा ग्राहकाकडे पैसे मागायला जातो तेव्हा ग्राहक म्हणतो की ,उद्या देतो, परवा देतो दहा दिवसांनी देतो, तुझे पैसे खातो का? तुझे पैसे पचवून टाकतो असे शब्द व्यापाराच्या कानावर घातले जातात हा आजवरचा अनुभव आहे.


ज्यावेळेस ग्राहक एखाद्या दुकानात जातो तेव्हा बैलाच्या स्वरूपात म्हणजे साधा आणि गोड बोलून व्यापाऱ्याकडून वस्तू उधारी मागतो परंतु तेच पैसे मागायला व्यापारी जेव्हा ग्राहकाच्या घरी जातो तेव्हा मात्र वाघासारखा रूप धारण करून व्यापाराला धमकवण्याचा काही ग्राहक प्रयत्न करीत असतो..



ग्राहक माझा देव आहे ही म्हण आता कालबाह्य झालेली आहे. एखादी ग्राहक एखाद्या दुकानांमध्ये सर्वप्रथम उदारी करतो आणि तोच नंतर ग्राहक दुसऱ्या दुकानांमध्ये जाऊन तिकडे सुद्धा उधारी सामान घेतो अशा प्रकारे व्यापाऱ्यांना फसविले जाते. त्यामुळे व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होत असते. प्रत्येक माणसाला कधी कधी आर्थिक अडचण असते ही अडचण लक्षात घेऊन व्यापारी ग्राहकाला काही दिवसाच्या मुदतीवर सामान उधार देत असतो परंतु याचा फायदा घेणारे अनेक ग्राहक आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील शहरी भागातील अनेक व्यापार उद्ध्वस्त झाल्याचे आज चित्र दिसत आहेत .

प्रसंगी त्यांना मोठ्या प्रमाणात व्यवसायामध्ये या उधारीमुळे तोटा सहन करावा लागत आहे ही आजची वस्तुस्थिती आहे .



त्यामुळे सुजाण नागरिकांनी सुद्धा आपण उधारी घेतलेल्या वस्तूचा पैसे देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तरच व्यवसाय बुडणार नाही. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये काही अंशी लोकांना व्यापारी उधारी देत असतो परंतु तो उधारीचा पैसे मागण्याकरिता ग्राहकाच्या घरी दहा वेळा चकरा मारावे लागत आहे.

उधारी देणे हा विश्वसनीय व्यवहार आहे पण याचा वाईट लाभ घेणाऱ्या अनेक ग्राहक आहेत त्यामुळे एका ग्राहकामुळे इतर ग्राहकांना कधी कधी बोलणे सोसावे लागत असल्याचे सध्याच्या परिस्थितीमध्ये चित्र दिसत आहेत. ज्या ग्राहकाचा व्यवहार व्यवस्थित उत्तमरीत्या सुरू असते अशा ग्राहकाला व्यापारी कधीही आणि किती रुपयाचा माल उधारी देऊ शकतो परंतु अशा उधारी न दिलेल्या व्यक्तीला वेगळ्या दृष्टीने बघितले जाते . आज हजारो करोडोचे व्यवहार विश्वासावर जगामध्ये केले जातात. पण हाच पैसा आपला ग्राहकावरी डूबतो तेव्हा मात्र मनामध्ये हळहळ होत असते.

त्यामुळे ग्राहकांना नम्र विनंती आहे की आपण घेतलेल्या कोणत्याही मालाचे उधारी काही कालावधीमध्ये परत करावी जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये संबंधित व्यापारी आपला व्यवहार उत्तम आहे म्हणून तुम्हाला सहकार्य करेल. अशी धारणा ठेवून ग्राहक आणि व्यापारी आपले हितसंबंध जोपासवे तसेच व्यापारी वर्गाने सुद्धा अशा बुडवलेल्या ग्राहकांची यादी बनवून आपल्या दुकानांमध्ये नोटीस बोर्डावर लावावी तसेच ज्या ग्राहकानी व्यापाऱ्याची फसवणूक करतो अशा ग्राहकपासुन सावध राहण्याची भूमिका व्यापार वर्गाने घेतली पाहिजे तरच कुठे हा आपला आर्थिक व्यवहार सोईस्कर पार पडेल... अन्यथा आपला व्यवसाय डबगाईस येऊन नष्ट होईल कारण प्रत्येक व्यवहार हा विश्वासावर अवलंबून असतो एवढे मात्र खरे...

Post a Comment

Previous Post Next Post