पेंढरी—धानोरा मार्गावर आता विश्वविक्रमी खड्डे

प्रतिनिधी पेंढरीः प्रशांत पेदापल्लीवार 

पाच महीण्यातच लागली रस्त्याची वाट

 पेंढरीःअत्याधुनिक मशींन्स व प्रचंड मनुष्यबळ वापरुन तयार करण्यात आलेल्या पेंढरी,मुंगनेर, चव्हेला,धानोरा या विश्वविक्रमी रस्त्यावर अवध्या पाच महीण्यातच खड्डे पडायला सुरवात झाली आहे. त्यामुळे या मार्गाचे डांबरीकरण केवळ विश्वविक्रमी नोंदवण्यासाठी करण्यात आले का? असा सवाल वाहन चालक व समस्त जनतेसमोर उभा ठाटला आहे. पावसामुळे या मार्गाची अक्षरशः चाळन होऊ लागली आहे. पाच महिण्यापूर्वी पेंढरी ते धानोरा पर्यत विश्वविक्रमी रस्ता उभारण्यात आला तो केवळ डांबरीकरणापुरताच ठरला.पावसाच्या पाण्याने अवध्या महिण्यातच या रस्त्याला खड्डे पडायला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी रस्त्यासाठी वापरलेले साहीत्य निकृष्ठ असल्याने दिसुन येते. हा रस्ता बांधताना वाहन चालक तसेच परिसरातील गाव खेड्यातील नागरीकांमध्ये रस्त्याचा कामा बाबत चर्चेला ऊधान आले होते. पण पाच महिण्यातच खड्डे पडायला सुरवात झाली आहे.अनेक ठिकानी रस्त्याचे डांबरीकरण गायब होउन गिट्टी ठळक पने दिसुन येत आहे.अजुनअर्धा अधिक पावसाळा बाकी आहे. केवळ पाच महिण्यात विश्वविक्रमी रस्त्यावर एक छोटासा खड्डा पडत असला तरी रस्त्याचे बांधकाम आणी दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थीत झाल्या शिवाय राहत नाही.




Post a Comment

Previous Post Next Post