धान घोटाळ्याची पोलीस तक्रारच नाही?

धानोरा : मुरूमगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या खरेदी केंद्रावरील ९८७८.९५ क्विंटल धानाच्या घोटाळाप्रकरणी आदिवासी विकास महामंडळाने दोन अधिकाऱ्यांचे निलंबनही केले आहे. मात्र या प्रकरणाची तक्रार अद्याप पोलिसांकडे आलेली नसल्याची माहिती धानोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधाकर देडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार यांना विचारले असता पोलीस तक्रार करण्याची सूचना दि.१५ ला केली असून त्यात खरेदी केंद्र चालविणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष, सचिव, संचालक आणि व्यापाऱ्यांवर ठपका ठेवलेला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान शुक्रवारी आपण स्वत: जाऊन याची शहानिशा करणार असल्याचेही त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.धान घोटाळ्याची पोलीस तक्रारच नाही?

Post a Comment

Previous Post Next Post