आरमोरी मध्ये शासनाच्या निधीचा व्यर्थ उपयोग....

प्रितम जांभुळे तालुका प्रतिनिधी सुपरफास्ट न्यूज नेटवर्क
7588964322


आरमोरी:- पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने घरामध्ये पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळाले. व काही ठिकाणी नाल्याचे पाणी पास न झाल्याने काही लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळाले. 
आझाद चौकातील देवेंद्र देशपांडे यांच्या घरातील चारही खोल्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. नालिचापाणि पास न झाल्याने असे झाले होते. त्यानंतर नगरसेवक व नगरपालिकेच्या कर्मचारी यांनी चौकशी करून नालिवरील पुल फोडून नवीन नालि बांधकाम करण्यात येईल व नालितील पाणी वाहून नेण्याची व्यवस्था करण्यात येईल अशी आश्वासन दिले . 


त्या नंतर नालिवरील बांधकाम तोडून नवीन बांधकामाला सुरवात करण्यात आली आहे. 
परंतु नालिचे बांधकाम हे अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे. नालिचे पाणी अजुनही पासहोत नसल्याने नालिचे काम पहिल्या सारखेच आहे मग या कामासाठी लाखो रुपयांचा शासकीय निधी वाया गेल्याचे दुष्य पाहायला मिळत आहे. 
या कामाकडे कुठलाच नगरसेवक किंवा शासकीय कर्मचारी लक्ष्य देत नाही व भिरकावून पाहायला येत नसल्याने जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. असेच दुष्य आरमोरीतल सर्व चालू असलेल्या शासकीय कामावर पाहायला मिळते. अशा सर्व कामाची चौकशी करावी व दोशींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post