रानडुक्कराची शिकार प्रकरणी दोन आरोपींना अटक*

चामोर्शी वनपरिक्षेत्राची कारवाई


चामोर्शी:- दि.25.08.2022 रोजी चामोर्शी वनपरिक्षेत्रा  अंतर्गत भाडभिडी उपक्षेत्र, आमगाव नियतक्षेत्रातील मौजा रेखेगाव येथिल गौतम बिजा वाळके यांच्या घरी रानडुक्कराची मटन असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे वनकर्मचा-यांनी रात्रो 8.30 ते 9.00 वाजता गौतम बिजा वाळके यांच्या घरी पंचासमक्ष जाऊन पाहणी केली असता एका जर्मनी गंजा मध्ये रानडुक्कराची शिजवलेली मटन आढळून आली.  तेव्हा त्याची चौकशी केली असता त्यांनी मौजा रेखेगांव येथिल विक्की प्रफुल गोटा यांच्या कडून खरेदी केल्याचे सांगितले. तेव्हा दोन्ही आरोपी विरुद्ध वनगुन्हा नोंद करून अटक केली व दि.26.08.2022 रोजी मा.न्यायदंडाधिकारी,चामोर्शी यांचे समक्ष हजर केले असता व न्यायालयाने आरोपींना दि.26.08.2022 ते  दि. 27.08.2022 पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.


             या घटनेत अधिक आरोपी समाविष्ट असल्याची संभावना नाकारता येत नाही. या घटनेचा पुढील तपास मा.राहुलसिंग टोलीया ,उपवनसंरक्षक, श्री.प्रदिप बुधनवर प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी, आलापल्ली यांचे मार्गदर्शनाखाली श्री.आर.बी.इंनवाते यांच्या नेतृत्वात श्री.व्हि.एस.चांदेकर क्षेत्र सहाय्यक, भाडभिडी, श्री.विकास लांजेवार ,वनरक्षक, आमगाव,अक्षय राऊत वनरक्षक, किशोर वैरागडे वनरक्षक,राव वनरक्षक, आनंद साखरे वनरक्षक, दिपक दुधबावरे वाहन चालक आदी कर्मचारी करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post