युवारंग तर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी निशुल्क ट्युशन क्लासेस चे उद्घाटन.*

युवारंग च्या निशुल्क ट्युशन क्लासेस मधून विद्यार्थ्यां कराटे ,संगणक प्रशिक्षण, नृत्यकला, अभिनय व व्यक्तिमत्व विकासाचे धडे देऊन सर्वांगीण विकास करणार- राहुल जुआरे






आरमोरी :- शिक्षण क्षेत्रात वाढत चाललेले खाजगीकरण व त्यामुळे सर्वसामान्यांची होणारी अडचण यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना शिक्षण देताना खूप चिंताजनक परिस्थितीला सामोर जावे लागते त्यातच एकीकडे श्रीमंत मुलांसाठी असलेल्या खाजगी शाळा तर सर्वसामान्य वंचित गरीब विद्यार्थ्यांना मात्र जिल्हा परिषद च्या शाळेत शिक्षण घ्यावे लागते आहे दुसरीकडे श्रीमंत घरातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ट्युशन क्लासेस ने त्यांचा अभ्यास पूर्ण करविला जात आहे तर सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना ट्युशन ला जाण्यासाठी सुद्धा पैसे नसतात त्यामुळे ते ट्युशन लावू शकत नाही अशी गरीब व श्रीमंत यातील शिक्षणाची खूप मोठी दरी समाजात निर्माण झालेली बघावयास मिळते ही दरी भरून काढण्यासाठी युवारंग च्या माध्यमातून मागील ४ वर्षापासून निशुल्क ट्युशन क्लासेस आरमोरी शहरांमध्ये राबविले जात आहे या निशुल्क ट्युशन क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणा व्यतिरिक्त संगणक ,डान्स ,कराटे व विविध खेळ शिकवून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व आजचे हे चिमुकले विद्यार्थी भविष्यातील देशाचे सक्षम नागरिक व्हावे यासाठी युवारंग चे प्रयत्न सुरू आहेत क्रीडा ,शैक्षणिक ,सामाजिक ,आरोग्य औद्योगिक, कृषी ,महिला सशक्तिकरण व अन्य क्षेत्रात नेहमी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या युवारंग तर्फे ट्युशन क्लासेस चा उद्घाटन सोहळा दिनांक ४ ऑगस्ट २०२२ ला सायंकाळी ६:००वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय इंदिरानगर ,बर्डी आरमोरी येथे पार पडला 


या उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. मनोजजी काळबांडे साहेब तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युवारंग क्लब चे संस्थापक तथा अध्यक्ष मा.राहुलजी जुआरे तर प्रमुख अतिथी म्हणून क्रांतीज्योती .सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय व अभ्यासिका, आरमोरी चे अध्यक्ष मा. नेपचंद्रजी पेलणे ,सामाजिक कार्यकर्त्या मा. कळमरकर मॅडम उपस्थित होते याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. मनोजजी काळबांडे साहेब यांनी युवारंग तर्फे सुरू केलेल्या निशुल्क ट्युशन क्लासेस चा विद्यार्थ्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा व वाईट सवयींचा त्याग करून विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी आत्मसात करून संत महापुरुषांना अपेक्षित असलेला समाज व राष्ट्र निर्माण करावे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक पेन वाटप करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थी पालक व बहुसंख्येने वार्डातील नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन चारुदत्त राऊत प्रास्ताविक नेपचंद्र पेलणे यांनी तर आभार अजय कुथे यांनी व्यक्त केले

Post a Comment

Previous Post Next Post