वडिलाने मुलावर बंदुकीतून गोळी झाडून केली मुलाची हत्या

गडचिरोली :- बांबू कटाईच्या पैशातून पिता-पुत्रात वाद होवून वडिलाने मुलावर बंदुकीतून गोळी झाडून हत्या केल्याची घटना 26 ऑगस्ट रोजी भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या धुळेपल्ली येथे घडली. रानू कोपा आत्राम (32) , असे मृतक मुलाचे तर कोपा वंजा आत्राम (60), असे आरोपी वडिलाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच, ताडगाव पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होवून पंचनामा केला. पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेनासाठी रुग्णालयात पाठविला. घटनेसंदर्भात शनिवारला गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास ताडगाव पोमकेचे प्रभारी अधिकारी मनोज अहिरे करीत आहेत.



भरमार बंदुकीतून झाडली गोळी

मागील अनेक वर्षांपासून आदिवासी समूदाय वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी आपल्याजवळ भरमार बंदूक ठेवत असतात. पोलिस विभागाच्या जनजागृतीमुळे अनेक आदिवासी बांधवांनी आपल्याकडील भरमार बंदुका पोलिसांकडे जमा केल्या. मात्र काही लोकांनी अजूनही आपल्याजवळ वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी भरमार बंदुका ठेवल्या आहेत. दरम्यान, 26 ऑग्स्टला धुळेपल्ली गावातील पिता-पुत्राच्या वादात वडिलाने अंगणात झोपलेल्या आपल्या मुलावर भरमार बंदुकीतून गोळी झाडून हत्या केली.



Post a Comment

Previous Post Next Post