वाहनाच्या धडकेत कोरची येथील इसम गंभीर जखमी

कोरची : पकनाभट्टीवरून पायदळ कोरचीला येत असताना गोटूल भूमीजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने कोरचीतील गौरी चौकातील एका इसमाला धडक देत गंभीर जखमी करून फरार झाल्याची घटना शनिवारच्या रात्री ९ वाजता दरम्यान घडली आहे.

जखमी खोरबहारा पतीलाल जमकातन (वय ५६, रा. कोरची) असे जखमीचे नाव आहे. जमकातन हे व्यक्तिगत कामासाठी शनिवारी सायंकाळी पकनाभट्टी येथे गेले होते. परत येताना कोरची- देवरी महामार्गावरील गोटूल भूमीजवळील

रस्त्यावर अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. ते जागेवरच
बेशुद्धावस्थेत पडून होते. ये-जा करणाऱ्या लोकांनी त्यांना कोरची ग्रामीण रुग्णालयात तत्काळ दाखल केले. त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. लहान मेंदूला जबर मार लागल्याने त्यांच्यावर ऑपरेशन व उपचारासाठी नागपूरला हलविण्याची गरज असल्याची माहिती मिळाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post