सासरी आलेल्या जावयाचा मृतदेह विहिरीत आढळला

गोंदिया:-  सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढरी येथे आलेल्या जावयाचा मृतदेह पांढरी येथील शेतातील विहिरीत आढळला. अशोक मोडकू टेंभुर्णे (५१, रा. घानोळ ता. साकोली, जि. भंडारा) असे मृताचे नाव आहे. १३ ऑगस्ट रोजी आपल्या मुलाबाळांसह आपल्या सासरी पांढरी येथे आला होता. तो बेपत्ता झाल्याने १४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता डुग्गीपार पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली.

१६ ऑगस्टच्या सकाळी ११.३० वाजता पांढरी येथील शेतशिवारातील असलेल्या विहिरीच्या पाण्यात मृतावस्थेत आढळला. सूरज अशोक टेंभुर्णे (२३, रा. घानोळ, ता. साकोली, जि. भंडारा) यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस नायक सचिन गेडाम करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post