अत्याचारातून सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी झाली गरोदर

घुग्घूस येथील अमराई वॉर्ड क्रमांक 2 येथील एका सोळा वर्षीय मुलीचे नकोडा येथे असणाऱ्या एका (19) वर्षीय युवकाशी प्रेमसंबंध जोडून लैंगिक अत्याचार केला यात सोळा वर्षीय मुलगी गरोदर असल्याची घटना आज उघडकीस आली. लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकाचे नाव भूषण ज्ञानेश्वर बांदूरकर (19) वर्ष रा. नकोडा असे आहे.



याची तक्रार फिर्यादी मुलीने पोलीस स्टेशन येथे दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 376, एन, एच भादवी सहकलम 4,6,10 पास्को बालकाचे लैंगिक अपराध नुसार संरक्षण अधिनियम 308/ कलम 376 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वृत लिहीत पर्यंत आरोपीला अटक नाही पुढील तपास पीएसआय मेघा गोखरे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post