देसाईगंज तालुक्यात पुर परिस्थिमुळे शेकडे हेक्टर शेतिचे नुकसान

देसाईगंज,:-

गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे देसाईगंज तालुक्याला मोठा फटका बसला या एका आठवड्यात दोन वेळा पुर परिस्थिती निर्माण झाल्याने देसाईगंज तालुक्यातिल शेकडो हेक्टर शेती पुर परिस्थिती मुळे बाधित झाली  गोसेखुर्द धरणात या वर्षिच्या संततधार पावसामुळे पाणिसाठ्यात अतिरिक्त वाढ झाली त्याच बरोबर संजय सरोवर व इतर दोन धरणातही अतिरिक्त पाणिसाठा झाल्याने पाण्याचा सर्व विसर्ग वैनगंगा नदिवर बांधलेल्या गोसेखुर्द धरणात जमा झाल्याने पहिल्यांदा १६ हजार क्युरेक्स मिटर पाणि सोडण्यात आले या पाण्याने वैनगंगा नदिपाञाच्या लगत असलेली सावंगी आमगाव विर्शी तुकुम वडसा जुनी कुरुड कोंढाळा या सह गाढवी नदि लगत असलेले तुळशी कोकडी अरततोंडी किन्हाळा मोहटोला चोप कोरेगाव बोळधा यासह तालुक्यातल इतरही गावांना मोठा हादरा बसला अनेक घरांची पडझड ही झाली त्याच बरोबर तालुक्यातिल शेकडो हेक्टर शेती बाधित झाली दोन दिवसांनी पुर परिस्थिती नयंञणात आल्याने शेतकर्यांनी पिक वाचविण्यासाठी रासायनिक खतांसह टॉनिक शेत औषधी ही शेतात टाकली माञ निसर्गाचा प्रकोप शेतकर्यांच्या जिवावर धाऊन आला तिसर्याच दिवसी गोसेखुर्द च्या पाण्यात दुप्पट वाढ झाल्याने पाण्याचा विसर्ग २१हजार क्युरेक्स मिटर पातळीने सोडण्यात आल्याने अवघ्या तिन दिवसातच तालुक्यातिल शेतकर्यांच्या शेताची पुरती दैनाअवस्था झाली पुर परिस्थितीमुळे वडसा गडचिरोली वडसा लाखांदुर संपर्क दोन दिवस बंद राहिला दुसर्यांदा पुर आल्याने तालुक्यातिल धानपिक सडले असुन यावर प्रभावी जनप्रतिनिधींसह शासन लक्ष देईल काय? असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे सावंगी येथिल सडलेल्या धानपिकाची पाहणी करतांना राजु कुरेशी सह शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post