मोठी बातमी ! - राज्यात पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज*

🌎 *मोठी बातमी ! - राज्यात पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज*

🌧️ बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्या निर्माण झाल्यामुळे हवामान विभागाने राज्यातील विविध भागात पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

💫 कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे

🤷‍♂️ *काय सांगितले हवामान विभागाने ?*

▪️ कोकणातील रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत 22 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर ठाणे, पालघरसह मुंबईच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडणार

▪️ तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात 22 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. 

👉 *२१ आणि २२ ऑगस्टला* - विदर्भाच्या चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे - तर अकोला, अमरावतीसह वर्धा जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

▪️ याव्यतिरिक्त मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post