तो पुन्हा आला..... दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून केले जखमी

मुल - मुल तालुक्यातील अनेक गावात यावर्षी १६ घटना वाघाच्या हल्याच्या घडल्या असून दिनांक १७/८/२०२२ रोजी मौजा करवंन येथील भाऊराव गेडाम वय ५५ वर्षे हा गुराखी गावातील गुरे चारण्याकरीता करवन गावापासून सात किलोमीटर अंतरावर दाट जंगलात गेला असता जंगलात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी केले.

सदर घटना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत होताच वन परिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर यांनी आपले वन कर्मचारी घेऊन तिथे दाखल झाले. तपासणी केली असता गुराखी चालू शकत नसलेल्या अवस्थेत असल्याने त्याला अक्षरशः कावड बांधून आणण्यात आले. व मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले.

सदर घटना मारोडा बीटातील कक्ष क्रमांक ७७३ मधली असून या परिसरात नेहमीच वाघाच्या घटना घडत असल्यामुळे या परिसरातील जंगलात अती खोल दूरवर गुरे चारण्यासाठी गुराख्यानी किंवा इतर शेतकरी शेतमजुरी करण्यासाठी जाऊ नये अशा सूचना वनविभाग अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आल्या असून जंगल परिसरातील नागरिकांना विनंती सुद्धा केली करण्यात आली आहे. असे असताना नागरिकानी इतक्या दाट जंगलात गुरे चरायला घेऊन जाणे योग्य नाही. वाघापासून नागरिकांनी देखील सावध राहावे आणि वनविभागाला सहकार्य करावे असे मत येथील वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post