भयंकर .... अति भयंकर .... क्रूर प्रथा! इथं कुटुंबात कुणाचाही मृत्यू झाला तर कापलं जातं जिवंत महिलेचं 'हे' अंग

इंडोनेशियातील जन्मापासून मृत्यूनंतर प्रत्येक देश, धर्म, जाती, समाज यांच्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा, असतात. मुंडण, काळे कपडे घालणे अशा शोक प्रथा तुम्हाला माहिती असतील.

पण एका समाजात इतकी भयंकर प्रथा आहे, जी फक्त वाचूनच तुमच्या अंगावर काटा येईल. ती एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील जिवंत महिलांचं एक अवयव कापला जातो. ही धक्कादायक प्रथा आहे इंडोनेशियातील दानी आदिवासी समाजातील. जेव्हा एखाद्याच्या घरातील सदस्याचं निधन होतं तेव्हा कुटुंबातील इतर सदस्य अतिशय भावनिक होतात.

पण इंडोनेशियातील दानी आदिवासी समाजातील महिलांना मानसिक वेदनांशिवाय शारीरिक वेदनाही सहन कराव्या लागतात, जेव्हा त्यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन होतं घरातील सदस्याच्या निधनानंतर या महिलांची बोटं कापली जातात. बोटं कापण्याआधी महिलांची बोटं दोरीने बांधली जातात जेणेकरून तिथला रक्तप्रवाह थांबेल. त्यानंतर कुऱ्हाडीने बोटांचा वरील भाग कापला जातो. या कापलेल्या बोटांचे तुकडे सुकवले जातात आणि त्यानंतर ते जाळून त्यांची राख एका विशिष्ट ठिकाणी ठेवली जाते.

हे लग्न झालेल्या महिलांपेक्षा सिंगल मुलीच...; संशोधनातून झाला मोठा खुलासा पापुआ गिनी बेटावर दानी आदिवासी समाज राहतो. अडीच लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या या जातीचे लोक पश्चिमी न्यू गिनीच्या उंच आणि घनदाट भागात राहतात. 1938 मध्ये अमेरिकी एक्सप्लोरर रिचर्ड आर्कबोल्डने जेव्हा या भागात उड्डाण केलं तेव्हा याची माहिती मिळाली. या भयंकर प्रथेवर आता पापुआ गिनीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण असं म्हटलं जातं, की अजूनही गुप्त पद्धतीनं ही प्रथा सुरूच आहे. इथल्या बहुतेक महिलांची बोटं अशी कापलेली आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post