गणपती वर्गणीच्या वादात माईकच्या दांड्याने मारहाण


भंडारा : सार्वजनिक गणपतीच्या वर्गणी मागण्यावरून झालेल्या वादात माईकच्या दांड्याने एका तरुणावर हल्ला करण्याची घटना भंडारा तालुक्यातील खरबी येथे बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. डोके फुटल्याने तरुण रक्तबंबाळ झाला असून, आरोपी तरुणाविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र महादेव वंजारी (२८) रा. खरबी, ता. भंडारा असे जखमीचे नाव आहे. तर गणेश चैतराम मेहर (३६) असे आरोपीचे नाव आहे

महेंद्र आपल्या घराजवळ स्थापन केलेल्या सार्वजनिक गणपतीच्या मंडपात बसला होता. त्यावेळी तेथे गणेश आला. त्याने ५०० रुपये वर्गणीची मागणी केली तेव्हा मी गणपतीची व महाप्रसादाची वर्गणी दिली आहे. आता कशाला देऊ, असे म्हटले. त्यावरून गणेशने वाद घातला. मंडपात ठेवलेला माईकचा स्टॅन्ड हातात घेऊन महेंद्रच्या डोक्यात मारला. त्यामुळे डोके फुटून महेंद्र रक्तबंबाळ झाला याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post