आला आला लांडगा आला.... अन्

लाखांदूर : शिकारीच्या उद्देशाने गावात शिरलेल्या लांडग्यांनी पाच शेळ्या ठार मारल्याची घटना तालुक्यातील दोनाड व ओपारा येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव जनावरे ठार होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दोनाड येथील हिरामण भिका भानारकर यांच्या दोन शेळ्या तर ओपरा येथील राहुल लोमेश राऊत यांच्या तीन शेळ्यांची लांडग्यांनी शिकार केली. एक महिन्यात लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील विविध गावात लांडग्यांनी शेळ्यांवर हल्ला चढविल्याच्या विविध घटना उघडकीस आल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post