अखेर जिल्हाभरातील १० कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

गडचिरोली : कृषी निविष्ठा विक्री करताना कृषी विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन योग्य प्रकारे होत आहे किवा नाही याची तपासणी करण्यासाठी गेलेल्या भरारी पथकाला अनेक ठिकाणी अनियमितता आढळून आली. त्यामुळे जिल्हाभरातील १० कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले.

व्हिडियो



परवाना निलंबित केलेल्या कृषी केंद्रांमध्ये दिनेश कृषी केंद्र अडपल्ली ता. चामोर्शी, साईराम कृषी केंद्र चामोर्शी, अभिजित कृषी केंद्र चामोर्शी, अनुप कृषी केंद्र चामोर्शी, परमात्मा एक कृषी केंद्र मानापूर ता. आरमोरी, अजय दास कृषी केंद्र धानोरा, हेमके कृषी केंद्र रांगी, सचिन कृषी केंद्र रांगी, चौधरी कृषी केंद्र मानापूर ता. आरमोरी आणि किसान कृषी केंद्र कोरेगाव ता. देसाईगंज या केंद्रांचा समावेश आहे.

याशिवाय चामोर्शीतील सी. डी. गांधी कृषी केंद्राला लिंकिंग असलेल्या ६० हजार रुपयांच्या खतांच्या विक्रीसाठी बंदी आदेश देण्यात आला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी ही निलंबनाची कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post