त्रिमूर्ती बुद्धविहार मोवाड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

दि.14 सप्टेंबर 2022 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते स्व. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे उदघाटन रशियाची राजधानी मास्को येथे स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर येथे करण्यात आले यांचे औचित्य साधून मोवाड येथे त्रिमूर्ती बुद्धविहारात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन व त्याच्या विचारावर मार्गदर्शन पर कार्यक्रम राबविण्यात आला. 


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील ठोसर, प्रमुख पाहुणे प्रा, प्रकाश सनेसर, नरखेड येथील वृक्षमित्र महादेव अरखेल, न.प.माजी नगराध्यक्षा सीमा बागडे, सुनिल धांडे, उमेश लहूळकर, सत्यम वसूले, गणेश हिवराळे, श्रीकांत मालधुरे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महिलांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याच्या जीवनावर आधारित भजननाने सुरुवात केली त्यानंतर सर्व मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे ,भारतरत्न डाँ, बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिबा फुले ,लहुजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली स्वागत समारंभ वस्ती मित्र व स्थान मित्र यांचा परिचय व त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रमुख मार्गदर्शन प्रा, प्रकाश सनेसर यांनी जनसामान्यांपर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्याचे व कर्तुत्वाचे वर्णन उपस्थित मान्यवारांना मार्गदर्शन केले भारताचे प्रधानमंत्री माननीय मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सप्ताह वृक्षारोपणाचा कार्यक्रम वृक्षमित्र महादेव अरखेल व सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व महिला मंडळांच्या समूहाने वृक्षारोपण करण्यात आले.प्रास्तविक सुनिल धांडे यांनी केले. तर आभार गणेश हिवराळे यांनी मानले उपस्थित नागरिकांना चहानास्ता वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post