आम आदमी पार्टी युवा मेळावा संपन्न"

गडचिरोली:-आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने ग्रामशेवक भवन येथे युवा मेळावा संपन्न झाला. सर्व प्रथम बाबासाहेब आंबेडकर तसेच शहीदे आजम भगत शिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. गुलाब पुष्प देऊन पाहुण्यांचे स्वागता नंतर मायाताई कोरेटी यांच्या सुमधूर गिताने पाहून्यांचे स्वागत करन्यात आले. २०२४ मध्ये मा.केजरीवाल यांना पंतप्रधान म्हनून संसदेत पाठविण्याचा प्रण घेऊन कामाला लागा असे उपस्थित कार्यकरत्यांना अजिंक्य शिंदे युवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी संदीप सोनावने,पियुश आकरे तसेच युवा आघाडी राज्य समिती सदस्य कृतल आकरे, मिडीया प्रमुख शितिज पगार, जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, जिल्हा सचिव भास्कर इंगळे, जिल्हा कोशाध्यक्ष संजय जीवतोड,अचीत ठाकूर, सुभाष गेडाम,मोरेश्वर मसराम,मायाताई कोरेटी,प्रदीप झोरे,धंनजय कुसराम,साहील बोदेले,नामदेव पोले,सोनल नन्नावरे,सुकेशिनी रामटेके,समीता गेडाम,अलका गजबे,निलकंठ दाने,रुषी गेडाम,सुरेश दाने, आनंदराव दाने,गणेश त्रिमूखे, संतोष कोटकर,अमण साखरे,मूकेश जनबंधु इत्यादी कार्यकर्ता हजर होते. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकर्ता प्रवेश सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांनी तर संचालन आम आदमी पार्टी जिल्हा सचिव भास्कर इंगळे यांनी केले. प्रमुख अतिथी व उपस्थितांचे आभार जिल्हा कोशाध्यक्ष संजय जीवतोड यांनी मानले आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रती,
मा.संपादक महोदय
स.न.वी.वी.आपल्या लोकप्रिय दैनिक, साप्ताहिक, न्युज पोर्टल मध्ये बातमी प्रकाशित करावी ही विनंती.

Post a Comment

Previous Post Next Post