सर्वग विकास अधिकारी प.स.धानोरा यांना गोंडवाना गोटूल सेना सचिव परमेश्वर गावळे यांचे कळून निवेदनातुन मागणी,* ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याची मागणी


 *प्रतिनिधी पेंढरीःप्रशांत पेदापल्लीवार* , 

 धानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पेंढरी—गट्टा परीसरातील ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक ग्रामपातळीवर राहत नसुन आठवड्यातुन दोन दिवस त्यांचा मूहूर्त ग्रामपातळीवर असतो, त्यामुळे या भागातील नागरीकांना कोणत्याही माहीती कींवा दाखल्यापासुन वंचित रहावे लागत आहे. देशाला स्वांतत्र होऊन ७५ वर्ष लोटुनही धानोरा तालुक्यातील पेंढरी—गट्टा परीसर नक्षलग्रस्त आदिवासी बहूल मागासलेला क्षेत्र म्हणून ओळखला जातो. ग्रामपातळीवर गावच्या सर्वागिन विकासाठी ग्रामसेवकांची महाराट्र शाशनाने नेमनूक करण्यात आली मात्र सदर नेमनुकीची पायमल्ली होतांना दिसुन येत आहे. बरेचदा ग्रामसभा आणी सभेला हजर राहत नाही असे दिसुन येत आहेत.त्यामुळे ग्रामपातळीवरील नागरीकांना शासनाच्या बहूतांश माहीती पासुन वंचीत रहावे लागत आहे. या करीता पेंढरी—गट्टा परीसरातील ग्रामसेवकांना ग्रामपातळीवर राहण्याची सक्ती करण्यात यावी अशी मागणी महाराट्र *गोंडवाना गोटुल सेनेचे सचिव परमेश्वरजी गावडे* यांनी निवेदनातुन केली आहे,,,



Post a Comment

Previous Post Next Post