बायकोच्या आंघोळीचा व्हिडीओ टाकताच फॉलोवर वाढले , डिलीट करण्यास पतीकडून नकार

सोशल मीडियावर पॉप्युलर होण्यासाठी आणि फॉलोवर मिळवण्यासाठी कोण काय करेल याचा भरवसा राहिलेला नाही अशीच एक धक्कादायक घटना समोर आलेली असून नवी दिल्ली येथील उत्तम नगर परिसरात राहणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाने त्याच्या पत्नीचे आंघोळ करताना शॉवर घेतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर लिक केले. व्हिडिओ कॉलवर तिच्यासोबत अश्लील संभाषण बोलला आणि तेदेखील त्यांनी सोशल मीडियावर टाकून दिले . त्याची पत्नी ही उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात राहते. तिच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याचे फेसबुक प्रोफाईल डिलिट केलेले आहे.

महिलेच्या म्हणण्याप्रमाणे, माझा नवरा हा सोशल मीडियाच्या पूर्ण आहारी गेलेला असून सोशल मीडियावर फॉलोवर मिळवण्यासाठी काय काय करता येईल याचा तो सतत अभ्यास करायचा. अनेक प्रकार त्याने करून पाहिले मात्र त्याच्या फॉलोवरच्या संख्येत वाढ होत नव्हती म्हणून त्याने हा पर्याय निवडला असावा असे मला वाटते. इतक्या खालच्या टोकाला तो जाईल याची मी कल्पनाही करू शकत नाही. त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर माझी अश्लील छायाचित्रे त्याने टाकली म्हणून मी त्याला विचारले मात्र त्यांनी त्याने आत्ता कुठे माझ्या अकाउंटला फॉलोवर येण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे मी हे फोटो काढून टाकणार नाही ‘ असे मला सांगितले.

आपल्या पतीकडून असे धक्कादायक उत्तर ऐकल्यानंतर या महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली असून आयटी कायदा 2008 अन्वये पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. ज्या फेसबुक अकाउंटवरून हे फोटो अपलोड करण्यात आले ते अकाउंट देखील पोलिसांनी कारवाई करून बंद केले असून जसराना येथील पोलीस अधिकारी ए पी सिंह यांनी याप्रकारे प्रकरणी माहिती दिलेली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post