संपूर्ण ग्रामपंचायतचा लेखा जोख बघा तुमच्या मोबाईलवर, जाणून घ्या ग्रामपंचायत ने कोणत्या नावाखाली किती निधी खर्च केला


नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण या लेखात ग्रामपंचायतची माहिती पाहणार आहोत, यामध्ये तुमच्या गावातील ग्रामपंचायतने किती किधी खर्च केला आहे याची माहिती पाहणार आहोत.


त्याचा प्रमाणे यामध्ये तुमच्या गावाला किती निधी मंजूर झाला होता व तो किती खर्च करण्यात आला आहे व अजून किती निधी खर्च करण्याची बाकी आहे याची हि माहिती या लेखात पाहणार आहोत.


तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये किती निधी वितरीत करण्यात आला होता व तो निधी किती प्रमाणात कामात आला आहे व किती निधी कामात आला नाही याची माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.




मित्रानो ग्रामीण भागामधील अनेक नागरिकाच्या हितासाठी विविध योजना राबविल्या जातात, त्यासाठी शासनाच्या वतीने निधी दिला जातो.

या निधीचे पाणी पुरवठा व स्वच्छता, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक विहीर दुरुस्ती इत्यादी योजनांसाठी शासनाकडून निधी पुरवठा केला जातो. पण अनेक नागरिकांना हा निधी किती व कधी मिळाला व तो कोणत्या कामासाठी मिळाला याची माहिती नसते.


मोबाईलवरून बघा ग्रामपंचायतचा सर्व लेखा जोखा 
तुमच्या गावातील विकास कामांसाठी gram panchayat fund details म्हणजेच निधी आपण जो बघणार आहोत तो एका एंड्राइड एप्लीकेशनच्या सहाय्यने बघणार आहोत. म्हणजेच यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक एंड्राइड एप्लीकेशन इंस्टाल करायचे आहे.

ग्रामपंचात निधी बघण्यासाठी गुगल प्लेस्टोअरवर अनेक एंड्राइड एप्लीकेशन्स उपलब्ध आहेत. योग्य एप्लीकेशन नाही शोधता आले तर तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

त्यामुळे केवळ शासकीय एंड्राइड एप्लीकेशनच इंस्टाल करा जेणे करून तुमची फसवणूक होणार नाही व gram panchayat fund details संदर्भात तुम्हाला अगदी अचूक माहिती मिळेल.

ग्रामपंचायत निधी बघण्यासाठी शासनाचे अधिकृत एंड्राइड एप्लीकेशनच कसे इंस्टाल करावे आणि यामध्ये तुमच्या गावाची निवड करून कशा पद्दतीने माहिती बघावी या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

तुम्ही सांगितलेले एंड्राइड एप्लीकेशन सरकारचेच आहे आणि याच एप्लीकेशनवर आम्हाला अचूक माहिती मिलेल याची काय शाश्वती आहे असा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर नक्कीच या प्रश्नांचे निरसन केले जाईल.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिनांक २४ एप्रिल २०२० रोजी e gram swaraj portal चा शुभारंभ केला होता. गावामध्ये जेवढेहि विकास कामे होतील त्यांचा संपूर्ण लेखा जोखा तुम्हाला या e gram swaraj app वर बघण्यास मिळेल असे त्यांनी सांगितलेले होते.

वास्तविक हि माहिती तुम्ही e gram swaraj website वर बघू शकता. परंतु मोबाईल एप्लीकेशनचा उपयोग करून माहिती बघितल्यास अधिक सोयीस्कर होते.


Post a Comment

Previous Post Next Post