दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन जखमी

देसाईगंज - कुरखेडा मार्गावरील तुकूम नजीकच्या धरमकाट्याजवळील घटना

कोरेगाव/चोप :- दोन - भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही दुचाकीचालक जखमी झाल्याची घटना आज ३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास देसाईगंज कुरखेडा मार्गावरील तुकूम नजीकच्या धरमकाटयाजवळ घडली. संजय फाये (३६) रा. विसोरा असे एका जखमीचे नांव असुन दुसरा जखमी गौरनगर येथील असल्याचे कळते.

प्राप्त माहितीनुसार विसोरा येथील संजय फाये हे बँकेचे काम आटोपून आपल्या दुकानात दुचाकीने जात होते. दरम्यान गौरनगर येथील दुचाकीस्वार विरूद्ध बाजुने येत होता. दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघेही जखमी झाले. दोन्ही दुचाकींचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. गौरनगर येथील दुचाकीस्वारास पुढील उपचारासाठी रेफर केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post