आला रे.. आला वाघ आला...वाघाने केला गुराख्याला ठार

गडचिरोली :- मुख्यालया पासून फक्त बारा किमी अंतरावर असलेल्या जेप्रा या गावच्या एफडीसीएम क्रमांक 1 च्या जंगल परिसरात आज सायंकाळी पाचच्या सुमारास वाघाने एका गुराख्याला ठार केल्याची घटना घडली.

वाघाच्या हल्यात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव नामदेव रामजी गेडाम वय 70 वर्ष असून हा व्यक्ती आपल्या घरातील जनावरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेल्यामुळे दुर्दैवाने आज पुन्हा एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

सायंकाळी पाचच्या दरम्यान जंगलात गेलेला सदर व्यक्ती परत न आल्याने गावकऱ्यांनी शोधाशोध सुरु केली होती, अखेर त्याचे मृतदेह जवळपास आठ वाजता जंगलात पाच किमी आतील भागात अढळून आलेला होता.



खडतर मार्गाने जवळपास तीन किमी अंतर पायी चालत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह गावात आणले होते हे विशेष...

वाघाच्या तावडीत सापडलेल्या लोकांची यादी निरंतर वाढत असल्याने, वन विभागाच्या वतीने वाघाचा बंदोबस्त कधी केला जातो याकडे लक्ष लागले आहे.




वन विभागाच्या वतीने वारंवार मनाई करण्यात आल्यानंतर सुध्दा मुद्दाम दुर्लक्ष करून जंगलात गेल्यामुळे या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले आहे. झालेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा आणि वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. वन विभागाच्या वतीने या नरभक्ष वाघाला जेरबंद करण्यासाठी, आवश्यक प्रयत्न होत असेल काय याबाबत आता शंकाच निर्माण झालेली असून, आता राज्य सरकारने कठोर निर्णय घेऊन वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी लोकांनी केलेली आहे

Post a Comment

Previous Post Next Post