वाघ आला वाघ आला गडचिरोली जवळ वाघ आला

गडचिरोली : शहरापासून केवळ अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या जंगलात वाघाने गाय ठार केली. विशेष म्हणजे या परिसरात गडचिरोली शहरातील नागरिक सकाळी फिरायला जातात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


पुलखल येथील प्रदीप महाजन यांची गुरवळा येथे गोशाळा आहे. या गोशाळेतील गायी चरण्यासाठी जंगलात सोडले असता गाय परत आली नाही. महाजन हे गुरवळा परिसरात गायीचा शोध घेत होते.

१८ सप्टेंबर रोजी गडचिरोली शहरातील काही नागरिक गुरवळा मार्गावर फिरण्यासाठी गेले असता त्यांना कावळे ओरडण्याचा आवाज आला. त्या ठिकाणी जाऊन बघितले असता वाघाने लाल रंगाची गीर जातीची गाय ठार केली असल्याचे दिसून आले. ही माहिती महाजन यांना देण्यात आली.

याबाबत महाजन यांनी सहायक वनसंरक्षक यांच्याकडे तक्रार केली. वनविभागाने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.


मॉर्निंग वॉकला जाताना सावधान

गडचिरोली शहरातील रामनगर व शाहूनगरातील शेकडो नागरिक गुरवळा मार्गावर सकाळी फिरण्यासाठी जातात. याच परिसरात वाघाने गायीला ठार केले. यापूर्वीही या परिसरात वाघाचे दर्शन नागरिकांना झाले आहे. त्यामुळे सकाळी फिरायला जाताना नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.

Post a Comment

Previous Post Next Post