शिक्षक करत होता तीन विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन.... पालकांनी केली कपडे फाटेपर्यंत धुलाई


परभणी:-: मुलींवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, ज्या नात्यांना आपण अतिशय आदराचे स्थान देतो. अशा नातेवाईकांकडून किंवा अगदी शिक्षकांकडून हे अत्याचार होण्याचे प्रमाण मोठे आहे. अशीच एक घटना महाराष्ट्रातील परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील शिवाजीनगर तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक असलेले बी. यु रुद्रवार हे या शाळेतील तीन विद्यार्थिनी बरोबर सातत्याने गैरवर्तन करत होते.


या विद्यार्थिनींनी या त्रासाला कंटाळून आपल्या आई-वडिलांकडे शिक्षकाची तक्रार केली. पालकांना संताप अनावर झाल्याने या शिक्षकाला पालकांनी शाळेवर जाऊन कपडे फाटेपर्यंत चोप दिला. हे सर्व प्रकरण गटशिक्षणाधिकाऱ्यापर्यंत नेऊन पोहोचवले.


गटशिक्षणाधिकारी तात्काळ त्या शाळेवर गेले. विद्यार्थिनी आणि पालक यांचे मुद्दे ऐकून घेतले. त्या शिक्षकाची चौकशी केली आणि 24 तासाच्या आत या शिक्षकावर कारवाई करण्याचे वचन देखील दिले. तरीदेखील, परिसरात संतापाची लाट असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post