वैरागड- जोगी साखरा मार्गावरील रस्त्याच्या बाजूच्या वाढलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यात यावे - नागरिकांची मागणी

आरमोरी :- वैरागड वरून सालमारा - जोगीसाखरा या रस्त्याने जात असताना रस्त्याच्या दोन्हीं बाजूला मोठ्या प्रमाणात झुडपे आल्याने या मार्गावरून वाहन जात असताना अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. या मार्गावर दररोज शेकडो वाहने धावत असतात तसेच या मार्गावरील या शेतकरी, व्यापारी वर्ग यांचे रात्रीच्या सुमारास या मार्गावरून जाणे - येणे असते अशा वेळेत या रस्त्यावर दोन्ही बाजूला झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुढील वाहन दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची अधिक संभावना असते.


*रस्त्याचा व्हिडियो*

👇👇👇👇👇👇👇👇👇



तसेच या मार्गाच्या परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याने वाहनधारक रस्त्यावरून जात असताना झुडपात बसून असलेला वाघ अचानक दुचाकीस्वारकावर हल्ला केल्यास अप्रिय घटना घडू शकते. याला जबाबदार कोण ? त्यामुळे संबंधित विभागाने वैरागड ते जोगीसाखरा मार्गे असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या फांद्या आणि झुडपे तोडण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post