अनुदानासाठी काळी फीत लावून शासनाचा निषेध

कोरची:- राष्ट्रीय विद्यालय बिहीटेकला ता. कोरची येथे आज शिक्षकदिनी शाळेतील कर्मचाऱ्यांनी अनुदानाच्या मागणीसाठी काळीफीत लावून शासनाचा निषेध केला.


*व्हिडियो जरूर बघा*

👇👇👇👇👇👇👇



गेल्या विस वर्षापासून सतत अनुदानाची मागणी करुनही शासनाने विनाअनुदानित शाळेकडे दुर्लक्ष केले आहे. शिक्षणासारख्या मुलभुत गरजेकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याबाबत शाळेचे मुख्यध्यापक श्री. बी. एम. डोंगरे यांनी या वेळी खंत व्यक्त केली.


यावेळी .स. शिक्षक श्री. कवाड‌कर सर, पुल्लुरवार सर, खोब्रागडे सर, फूलकुवर मॅडम तसेच शाळेचे जेष्ठ लिपीक श्री. बरुगवार सर व. श्री. संजय सोरी, नामदेव गौरकर, श्री- केवळराम जेंगठे शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post