सनदी नोकरी ,राजकारण व न्याय व्यवस्थेत बहुजनांचा मुलगा गेला पाहिजे* *नितेश कराळे यांचा स्पर्धावंत विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र*

*व्हीएमव्ही -नवसारी भागातील अभ्यासिकेचे आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भूमिपूजन*

*अमरावती २७ सप्टेंबर* : शहरी भागात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासह शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी सर्व सुविधांची पूर्तता करण्याकरिता सुसज्ज अशी अभ्यासिका निर्मितीसाठी रुपये ५० लक्ष निधी मंजूर करून आणला त्याबद्दल प्रशांत डवरे यांचे आपण अभिनंदन करतो. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी सुयश मिळवावे . त्यांनी प्रशासकीय सेवेत रुजू व्हावे. याकरिता त्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लाभावे. यासाठी मार्गदर्शक अभ्यासिका होणे गरजेचे होते. पुस्तके, संगणक, आदींसह अन्य आवश्यक उपयुक्त सुविधा उपलब्ध करीत १०० विद्यार्थ्यांना एकाच वेळी अभ्यास करणे सुलभ व्हावे, याकरिता आपण प्रयासरत आहोत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मागील परिसरात अद्यावत सुविधांनी परिपूर्ण असे क्रीडा संकुल उभारणीचा आगामी काळात आमचा मानस आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. आगामी काळाची गरज लक्षात घेता ही अद्यावत अभ्यासिका विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जना करीता एक अनोखी पर्वणी ठरणार आहे. असे प्रतिपादन आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी रविवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी नवसारी - व्हिएमव्ही मार्ग परिसर स्थित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक समीप नजीकच्या अमरावती महानगरपालिका क्रीडा संकुल समीप साकारल्या जाणाऱ्या सुसज्ज व सर्व भौतिक सुविधांनी पूर्ण असलेल्या अभ्यासिकेच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी उपस्थितांना संबोधून केले. यावेळी व्यासपीठावर आमदार सौ.सुलभाताई खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा प्रवक्ते-संजय खोडके, वर्धा स्थित फिनिक्स अँकेडमी चे संचालक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक-नितेश कराळे सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक-प्रशांत डवरे, माजी महापौर-ऍड. किशोर शेळके, माजी नगरसेवक-रतन डेंडूले, मंजुश्री महल्ले, नीलिमा काळे, प्रशांत महल्ले, छाया कथीलकर, आदी उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व अतिथींचे प्रशांत डवरे, सुयोग तायडे, प्रज्वल घोम, राजेंद्र टाके, रवी अढाऊ ,शैलेश अमृते, व सहकारी शिक्षक बांधव व भगिनींच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. आपल्याला मन की नाही तर काम की बात करायची आहे. दैवावादाकडे वळण्यापेक्षा पुरोगामीत्वाची कास धरणे हीच आगामी काळाची गरज आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की,मंदिरापेक्षा ग्रंथालयात जेव्हा गर्दी वाढेल तेव्हा देश महासत्ता होईल. भेदभाव विरहित निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा पुरस्कार करणारा विद्यार्थी प्रत्येक घरात घडला पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर हा टाळयलाच पाहिजे. समाजापुढे मोबाईल हा शाप की वरदान हा सध्या विचाराधीन मुद्दा आहे. सद्यस्थितीत वाढत्या महागाईवर ताशेरे ओढीत सिलिंडर, पेट्रोलचे वाढते दर लक्षात घेता, हेच का अच्छे दिन आहेत. अशी कोपरखळी हाणीत नितेश कराळे यांनी देशातील समस्यांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन डॉ. ए पी जे अब्दुल कलाम,स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, जगतगुरू तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आदींचे राष्ट्राच्या उभारणीत असलेले अविस्मरणीय योगदानाला घेऊन विविध- दाखले , संदर्भ देऊन कराळे सरांनी यावेळी युवक-युवतींना त्यांच्या जीवन कार्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. ओ बी सी आरक्षण, अग्नीवीर योजना, देशातील संवेदनशील मुद्यावर भाष्य करीत त्यांनी सर्वांना भविष्याचा वेध घेत शोध आणि बोध घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले.विद्यार्थ्यांना बालपणापासून मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे सांगीत नितेश कराळे यांनी आयुष्य लहान असले तरीही चालेल पण महान असले पाहिजे. असा यावेळी उपस्थित पालकांना हितोपदेश सुद्धा केला. अहिंसेचा पुरस्कार करणारे महात्मा गांधी लोकांना अद्यापही कळले नाही, याची खंत वाटते. ज्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी कळाले ते बराक ओबामा, नेल्सन मंडेला झाले. विविधतेने नटलेल्या या देशात आज उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता,आपण जगाला बुद्ध दिला हे विसरून चालणार नाही. असे सांगीत नितेश कराळे यांनी यावेळी राष्ट्रीय व जागतिक स्तरावर झालेल्या स्थित्यंतरे बाबत स्पष्ट व प्रखर विचारांची परखडपणे मांडणी केली. जनरल अबिलिटी टेस्ट अर्थात सामान्य क्षमता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आर या पार चे अंगी धाडस बाळगावे. असे सांगीत आपण ज्ञानायज्ञाचे काम हाती घेतले आहे. याकरिता एकच विनंती करतोय की क्षेत्र ग्रामीण असो की शहरी भागातील प्रत्येक ठिकाणी मंदिराच्या शेजारी व्यायामशाळा व अभ्यासिका उभारणी करीत सर्वानी सामूहिक पुढाकार घ्यावा. लोकशाही व्यवस्था नीट समजून घेऊन आपल्या मुलांना प्रशासकीय सेवा,राजकारण व न्यायपालिका या क्षेत्रात जाण्यासाठी पुढाकार घ्या. असे कळकळीची विनंती नितेश कराळे यांनी यावेळी उपस्थितांना केली. 
नितेश कराळे यांनी सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते मंडळींवर चौफेर फटके बाजी केली असता सर्व उपस्थितांमध्ये हास्याची खदखद उडाली होती . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-प्रा. संदीप जुनघरे यांनी केले. तर सर्व उपस्थितांचे प्रशांत डवरे यांनी आभार मानले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, भारत माता की जय च्या प्रचंड घोषणांनी यावेळी आसमंत दणाणून गेला होता.

*नवसारी स्थित महापालिका क्रीडा संकुलाचे भाऊसाहेब देशमुख असे नामकरण जाहीर- प्रशांत डवरे* 
व्हीएमव्ही ते नवसारी भागात झपाट्याने रहिवाशी क्षेत्र वाढत असून या भागात सर्वांगीण विकासाच्या सुविधा निर्माण केल्या जात आहे. यासाठी आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी भरगच्च निधी उपलब्ध करून दिल्याने या परिसराला नवी अमरावती अशी ओळख मिळाली आहे. दरम्यान अमरावती महानगर पालिका क्रीडा संकुलात अभ्यासिका निर्माण करण्यासाठी मागील तीन वर्षापसून प्रयत्न सुरु असतांना आता भूमिपूजन झाल्याने लवकरच सुसज्य व सर्व सोयींनी परिपूर्ण अशी अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी सुरु होणार आहे. तर या नवसारी स्थित अमरावती मनपाच्या क्रीडा संकुलाला शिक्षण महर्षी डॉ . पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याचा ठराव वर्ष २०२१ मध्ये आपण सुचविला होता , याला लगेच सर्वसाधारण सभेची मंजुरी ही मिळाली आहे. त्यामुळे सद्या पूर्णत्वाकडे असलेल्या या क्रीडा संकुलाला डॉ . भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख असे नामकरण करण्यात येत असल्याची घोषणा आजच्या प्रसंगी करण्यात येत असल्याचे माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून अधोरेखित केले.

Post a Comment

Previous Post Next Post