नवभारत विद्यालय अंतरगाव येथे शालेय बालपंचायत स्थापन*

निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मोबाईल EVM चा वापर

           मॅजिक बस इंडिया फाउंडेशन, चंद्रपूर संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका  समन्वयक श्री. आकाश गेडाम यांच्या नियंत्रणात सावली तालुक्यातील 37 शाळांमध्ये  वर्ग 06 ते 09 पर्यंतच्या 3843 विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी "खेळा द्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शालेय मुलांना देशातील निवडणूक पध्दतीची माहिती व्हावी तसेच मतदान जनजागृतीसाठी नवभारत विद्यालय अंतरगाव येथे शालेय बालपंचायत निवडणूक घेण्यात आली. 

निवडणूक प्रक्रियेत प्रामुख्याने उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे, प्रचार करणे, प्रत्यक्ष मोबाईल EVM चा मतदान करण्यासाठी वापर या प्रक्रियेच्या  माध्यमातुन शालेय बालपंचायत निवडणुक पार पडली.


            निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्याध्यापक श्री. कोंडेकर सर,  श्री. एम. एल. उमरे सर, श्री. पी. डब्लू. आंबूलकर सर, श्री. यु. एस. चौधरी सर, श्री. एन. एस. शेंडे सर, श्री. ए. आर. भोयर सर,  व तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. उंदिरवाडे, श्री. तरारे,  मॅजिक बस संस्थेचे शाळा सहाय्यक अधिकारी कु. श्रध्दा नागमोते आणि समुदाय समन्वयक कु. सुदीप्ता मुंघाटे यांच्या उपस्थितीत हि निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. निवडणुक प्रक्रियेनंतर निकाल जाहिर करण्यात आला. निवडुन आलेल्या उमेदवार विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन शपथ ग्रहण सोहळा पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post