21 वर्षांच्या तरुणाने गर्लफ्रेंड परीक्षेत नापास झाली म्हणून चक्क शाळाच पेटवून दिली

प्रेमात असलेले प्रेमवीर आपल्या पार्टनर साठी काहीही करायला तयार असतात. प्रेमात तर ते आकाशातून चंद्र, तारे तोडून आणण्याचे देखील सांगतात. देशात लैला – मजनू, हिर- रांझा, सोहनी – महिवाल असे अनेक प्रेमी होऊन गेले ज्यांनी आपल्या प्रेमापायी अनेक किस्से घडवले.पण आता आम्ही आपणाला ज्या प्रर्मविरा बद्दल सांगणार आहोत त्याने तर प्रेयसी साठी अख्खी शाळाच पेटवून दिली.

गर्लफ्रेंड परीक्षेत नापास होताच एका बॉयफ्रेंडने टोकाचं पाऊल उचललं आहे. बॉयफ्रेंड इतका संतापला की, त्याने थेट शाळेलाच आग लावल्याची भयंकर घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी या प्रकरणी तरुणाला अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने धक्कादायक खुलासा केला आहे.

एका रिपोर्टनुसार, मेनोयुफिया प्रांतात ही घटना घडली. एका 21 वर्षांच्या तरुणाने गर्लफ्रेंड परीक्षेत नापास झाली म्हणून शाळाच पेटवली आहे. या दोघांचं लग्न ठरलं असून त्यांचा साखरपुडा झाला आहे. होणारी पत्नी शाळेतील परीक्षेत नापास झाली तर लग्न पुढे ढकललं जाईल. तिला पुन्हा वर्षभर अभ्यास करावा लागेल, या विचारातून तरुणाने गर्लफ्रेंडची शाळाच पेटवून दिली आहे. आगीमध्ये शाळेतील कंट्रोल रुम जळून खाक झाली आहे.

यात शाळेतील महत्त्वाची कागदपत्रं जळून गेली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाने काही वेळातच ही आग नियंत्रणात आली. शाळेला आग लावल्यानंतर तरुण पळून गेला आणि स्वत:च्या गावात जाऊन लपला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तरुणाला अटक केली. पोलीस चौकशीत तरुणानं गुन्ह्याची कबुली दिली. त्याला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सध्या तरुण पोलीस कोठडीत आहे

Post a Comment

Previous Post Next Post