क्रुझरच्या धडकेत महिला ठार


धानोरा : क्रुझर गाडीच्या धडकेत एक महिला जागीच ठार झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास येरकड-मालेवाडा रोडवरील इरुपटोला फाट्यावर घडली.

यमुना दयाराम मेश्राम (वय ५०, रा. मुरमाडी) असे मृतक महिलेचे नाव आहे. कुरखेडा येथील गाडी एमएच ३३ ए ४८०१ हे प्रवासी वाहन धानोरा येथून प्रवासी भरून कुरखेडा येथे जात होते. मृतक महिला ही रस्त्याच्या कडेला उभे राहून जनावरे चारत होती. अचानक वाहन दिसल्याने तिची तारांबळ उडाली. चालकाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ती गाडी खाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिला नातेवाईक नसून ती एकटीच मुरमाडी येथे राहत होती. गाडीत बसणारे प्रवासी सुखरूप आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post