वाघाने एकाचवेळी मारल्या सात बकऱ्या?

सिरोंचा : तालुक्यातील सिरकोंडाच्या जंगलात शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास बकऱ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला करून एकाचवेळी सात बकऱ्यांना ठार मारल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. मात्र कळपात असणाऱ्या सात बकऱ्यांना एकाच हल्ल्यात वाघ मारू शकतो का, असा प्रश्न वन अधिकाऱ्यांना पडला असून, शनिवारी यासंदर्भात सविस्तर पंचनामा केल्यानंतरच काय ते स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार, वेन्नेलया गावातील बक्का येल्ला हे आपल्या बकऱ्या घेऊन सिरकोंडाच्या जंगलात गेले होते. संध्याकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वाघाने त्यांच्या बकऱ्यांवर हल्ला केला.

 यात सात बकऱ्या ठार झाल्याचे माहिती बक्का येल्ला यांनी वनविभागाला दिली. बामणी क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी आपल्या राउंड ऑफिसरला घटनास्थळी पाठविले. मात्र सकाळी त्या ठिकाणी प्राण्याच्या पायाचे ठसे आणि इतर बाबींचे निरीक्षण केल्यानंतर तो हल्ला वाघाचा होता की इतर कोणत्या प्राण्यांचा हे स्पष्ट होऊ शकेल, असे वनअधिकाऱ्यांनी सांगीतले.

Post a Comment

Previous Post Next Post