वृद्धावर लोखंडी सबलीने प्राणघातक हल्ला

तुमसर : जुना वाद उकरून काढत घराशेजारी राहणाऱ्या वृद्धावर लोखंडी सबलीने प्राणघातक हल्ला करण्याची घटना तालुक्यातील राजापूर येथे सोमवारी घडली. डोक्यावर व पायावर मारहाण केल्याने वृद्ध गंभीर जखमी झाला. या प्रकरणी गोबरवाही ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताराचंद सूरजु मालाधारे (७५), रा. राजापूर, ता. तुमसर असे जखमीचे नाव आहे. तर उकेश मारोती चौधरी (४०) असे आरोपीचे नाव आहे. गोबरवाही पोलिसांनी भादंवि ३०७, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी उकेश आणि जखमी ताराचंद दोघांचे घर समोरासमोर आहे. त्यांच्यात नेहमी वाद होत होते. सोमवारी ताराचंद किराणा दुकानातून साहित्य घेऊन रस्त्याने जात होते. त्यावेळी उकेशने ताराचंदला शिवीगाळ सुरू केली.

आज तुझा जीवच घेतो असे बोलून तो घरी गेला. काही वेळात लोखंडी साबल आणून ताराचंदच्या डोक्यात व पायावर हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ गावातील नागरिकांनी रुग्णालयात नेण्यात आले. जखमीचे बयाण व डॉक्टरांच्या अहवालावरुन गोबरवाही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक करंगामी करीत आहेत.

गावात खळबळ

वृद्ध व्यक्तीवर लोखंडी सबलीने हल्ला करण्याची घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. एकमेकांचे शेजारी असतानाही त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा नेमका कोणता उद्देश होता याचा तपास आता गोबरवाही पोलीस करीत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post