नागपूर येथे आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा भांडाफोड


नागपुर : पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा भांडाफोड करत दोन तरुणींसह तीन जणांना अटक केली. यात देहव्यापारांसाठी आणलेल्या दोन्ही तरुणीचे नागरिकत्व हे उझबेकिस्तान असल्याचे समोर आले आहे. प्रथमदर्शनी बनावट भारतीय ओळखपत्राच्या साह्याने नागपुरातील एका नामांकित हॉटेलमध्ये थांबल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे सामाजिक सुरक्षा विभागाने हॉटेलवर धडक करवाई करत दोन्ही तरुणींना ताब्यात घेत चौकशी सुरू केली. यात देहव्यापाराची आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचे समोर येत आहे.

नागपूरच्या सदर परिसरातील एक नामांकित हॉटेलमध्ये स्थानिक व्यक्तीच्या नावाने बुकिंग करून दोन परदेशी तरुण मुक्कामी असल्याची माहिती नागपुर पोलिसांना मिळाली. याप्रकरणी चौकशी केली असता त्या तरुणीकडे आधार कार्ड, पॅनकार्ड आणि वाहतूक परवाना असलेले भारतीय ओळखपत्र मिळाले. याप्रकरणी अधिक खोलात जाऊन पोलिसांनी चौकशी केली. या दोन्ही तरुणींना देहाव्यापारांसाठी काही दलालाच्या माध्यमातून नागपुरात आणण्यात आले असल्याचं धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. यात तिघांना अटक करण्यात आली आहे. तरुणीचे ओळखपत्र खरे आहे, की बनावट याचीची तपासणी सुरू आहे.

नागपूरात 23 सप्टेंबरला आंतराष्ट्रीय क्रिकेट सामना होत आहे. याच पार्श्वभूमीवर अनके परदेशी नागरिक सुद्धा हा सामना पाहण्यासाठी नागपूरात दाखल होतील. तसेच तपासा दरम्यान देहाव्यापारशी निगडित आक्षेपार्ह काही डेटाही तरुणीच्या मोबाईलमध्ये मिळाला. त्यामुळे या तरुणींना देहव्यापारासाठी आणल्याची खात्री पोलिसांना मिळाली.


या दोन्ही परदेशी तरुणीच्या माध्यमातून देहव्यापार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचे महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. यात तरुणीच्या दिल्लीत असणाऱ्या सहकाऱ्यांकडे त्याचे पासपोर्ट असल्याचे चौकशीत समोर आलेय. तसेच आणखी काही तरुणी ज्यांचा व्हिसा हा संपला असतांना अश्या पद्धतीने बनावट भारतीय ओळखपत्र बनवून राहत असल्याचे सुद्धा समोर आले. या तरुणीवर खोटे ओळखपत्र तयार करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच स्थानिक तीन जणांना अटक केली असून त्याच्यावर देहव्यापार करत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे पुढील काही दिवसात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचे जाळे किती खोलवर आहे, याचाही खुलासा होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे..

Post a Comment

Previous Post Next Post