अखेर उघडा होऊन चोरी करणारा अट्टल गुन्हेगार सापडला


नवी मुंबई - नवी मुंबईतील दिघ्यात निर्वस्त्र फिरणाऱ्या व्यक्तीला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी शोधून काढले आहे. तो अट्टल गुन्हेगार असून त्याच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल आहेत. बुधवारी साडेचार पाचच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले आहे.दिघा भागातील दाट लोकवस्ती असलेल्या झोपडपट्टी भागात अपरात्री एक निर्वस्त्र व्यक्ती फिरत होती. काही सीसीटीव्हीत त्याचे चित्रीकरण झाले. या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल नव्हता मात्र समाज माध्यमातून हा प्रकार काय आहे अशी नवी मुंबई पोलिसांना विचारणा झाली होती

सीसीटीव्ही व्यक्ती स्पष्ट दिसत असली तरी ओळख पटत नव्हती. या बाबत नजीकच्या काही पोलीस ठाण्याची मदत घेण्यात आली. त्यातून सदर व्यक्ती कळवा येथील असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. त्याच बरोबर या व्यक्ती विरोधात ९ गुन्ह्यांची नोंद आहे. या सर्व छोट्या चोऱ्या असून उघड्या दरवाजातून खिडकीतून हाती लागेल ते चोरी करीत होता. मात्र या साठी आपल्याला कोणी पकडू नये म्हणून निर्वस्त्र होऊन फिरत असे. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.रबाळे एमआयडीसी पोलीसांनी तपासाला गती देत दिघा विभागात चोरीच्या उद्येश्याने निर्वस्त्र फिरणाऱ्या चोरट्याला कळवा येथून अटक केली.

Post a Comment

Previous Post Next Post