मी पोलिस कर्मचारी आहे. तुला माहीत नाही का ? मी जेवणाचे बिल देतच नाही आणि देणारही नाही...

परभणी:- महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आली असून परभणी येथे एका पोलिस कर्मचाऱ्यांने ‘ मी पोलिस कर्मचारी आहे. तुला माहीत नाही का ? मी जेवणाचे बिल देतच नाही आणि देणारच नाही ‘, असे म्हणून परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या एका ढाब्यात चांगलाच धिंगाणा घातलेला आहे. सदर प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात या कर्मचार्‍याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

परभणी शहरापासून वसमतकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या एका ढाब्यात हा प्रकार घडलेला असून ओमकार मागणाळे असे या गुन्हा दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. रोहन काळे नावाच्या व्यक्तीचा वसमत रोडवर ढाबा आहे . तिथे ओमकार हे दोन जणांच्या सोबत संध्याकाळी सहाच्या सुमारास जेवण्यासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर वेटरने बिल दिल्यानंतर त्यांनी ढाबाचालकाला बोलावले आणि ‘ तुला माहीत नाही का मी पोलीस कर्मचारी आहे. तुला बघून घेईल ; अशी धमकी दिली त्यानंतर दारू पिली आणि धिंगाणा घालून बिल न देता ते निघून गेले.

सदर प्रकरणानंतर पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला असून ढाबा चालकाने झाल्या प्रकारानंतर तातडीने नवा मोंढा पोलीस ठाणे गाठले आणि तिथे या कर्मचार्‍याच्या विरोधात तक्रार दाखल केली. सदर प्रकरणी पोलीस तपास सुरू असल्याचे समजते .

Post a Comment

Previous Post Next Post