जि. प. उच्च. प्राथ. शाळा घुगूस (कन्या) येथे प्रत्यक्ष EVM मोबाईल चा वापर करून लोकशाही पद्धतीने घेतली बालपंचायत /शालेय मंत्रिमंडळ निवडणूक*

चंद्रपूर: निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मोबाईल EVMचा वापर
सन्माननीय प्रशांत लोखंडे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात शालेय मुलांना देशातील निवडणूक पध्दतीची माहिती व्हावी या उद्देशाने तसेच मतदान जनजागृतीसाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घुगूस (कन्या) येथे शालेय बालपंचायत निवडणूक घेण्यात आली.





बालपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने तसेच बाल पंचायती मधील मंत्री दुसऱ्या शाळेत गेल्यामुळे नव्याने दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी जि.प.उच्च प्रा. शाळा, घुगूस (कन्या) येथे लोकशाही निवडणुक पध्दतीने शालेय बालपंचायत तथा शालेय मंत्रीमंडळाची स्थापन करण्यात आली.या निवडणूक प्रक्रियेत प्रामुख्याने उमेदवारी अर्ज भरणे,माघार घेणे,प्रचार करणे,प्रत्यक्ष मोबाईल EVM चा मतदान करण्यासाठी वापर या प्रक्रियेच्या  माध्यमातुन शालेय बालपंचायत /शालेय मंत्रिमंडळ निवडणुक पार पडली.




शालेय बालपंचायत /शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्याध्यापक कु.मंदा मोरे मॅडम , मॅजिक बस ट्रेन टीचर तथा विषय शिक्षिका प्रतिभा येरमे मॅडम, रोशन काळे सर,तरवटकर मॅडम, पाल सर , दासरवार मॅडम , मसराम मॅडम, पोडे मॅडम यांचे उपस्थितीत हि प्रक्रिया यशस्वीरित्या पुर्ण केली.
यावेळी, मॅजिक बस चे शाळा सहाय्यक अधिकारी कू.पायल राजपूत समूदाय समन्वयक सोनू कामतवार यांचे सहकार्याने निवडणुक प्रक्रिया पार पडली.निवडणुक प्रक्रियेनंतर निकाल जाहिर करण्यात आला. निवडुन आलेल्या उमेदवार विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन शपथ ग्रहण सोहळा पार पडला.

यावेळी,अतिशय शांतता ठेऊन तसेच नियमांचे पालन करुन बालपंचायत निवडणूक यशस्वीरीत्या पार पडली.

Post a Comment

Previous Post Next Post