अखेर गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा सिटी 1 वाघ जेरबंद

वडसा :- वनविभागातील वडसा वनपरीक्षेत्राअंतर्गत यावरत असलेला आणि मानवी जिवीतास धोकादायक ठरलेला नर बाघ CT-1 यास जेरबंद करण्यास व गरजेप्रमाणे तज्ञांचे उपस्थितीत व पर्यावरण व वन मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्गदर्शक सुचनेत नमुद केल्यानुसार त्यास बेशुध्द करुन बंदीस्त करण्यास दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती.



सदर CT-१ (नर) वाघामुळे वडसा वनविभागात ६, भंडारा वनविभागात ४, व ब्रम्हपुरी वनविभागात ३ असे एकुण १३ मानवी मृत्यु झाले होते. सदर वाघास जेरबंद करण्यासाठी मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक, मा. रा. नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०४.१०.२०२२ रोजी वनभवन येथे बैठक होवून CT-१ वाघास जेरबंद करण्यास सुचना देण्यात आल्या होत्या. वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. महिप गुप्ता यांनी तात्काह दखल घेवून गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षकांना थ ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना समन्वयकाची जबादारी देवून युद्ध पातळीवर प्रयत्न करून CT- १ वाघाला जेरबंद करण्याचे निर्देश दिले होते. सदर सुचनानुसार ताडोबा व्याघ्र शिघ्र बचाव दल, RRT चंद्रपूर, नवेगाव नागझीरा व्याघ्र शिघ्र बचाव दल RRT, आणि अमरावती प्रादेशिक शिघ्र बचाव दल RRT वाघाला पकडण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करीत होते. सदर मोहिमेमध्ये वनविभागाने RRT वाहने, All Tarrain Vehicle, Real Time Monitoring System, Trap Net, Aluminium Machan, बंकर केज इत्यादी साधनांचा उपयोग करण्यात आला. दिनांक १२.१०.२०२२ रोजी देसाड़गंज लगत वळुमाता प्रक्षेत्रात या वाघाने गाईला ठार केले होते. त्याशिकारी जवळच वनविभागाच्या चमुने दुसरे बेट (सावज) बांधून सदर वाघास आकर्षित केले. आणि रात्रभर वाघावर बंकर केज मध्ये बसून पाळत ठेवली. दिनांक १३.१०.२०१२ रोजी सकाळी हा वाघ मारलेल्या शिकारीजवळ आला व बंकर केज मध्ये तैनात डॉ. आर. एस. खोब्रागडे, पशुवैद्यकिय अधिकारी वन्यजीव तथा RRT प्रमुख, श्री. ए. सी. मराठे, पोलिस नाईक (शॉर्पशुटर), श्री. राकेश अहुजा, बॉयोलाजीस्ट व त्यांच्या इतर टिम सदस्यांनी तात्काळ बंदुकीतून डॉर्ट मारून वाघाला बेशुध्द केले व वडसा वनविभागाच्या इतर कर्मचाऱ्यांनी वाघ शुध्दीवर येण्यापुर्वी कोणतीही इजा न होता पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात आले.



घटनेची माहिती मिळताच वनसंरक्षक, गडचिरोली यांनी भेट देवून जेरबंद वाघाला गोरेवाडा येथे पाठविण्याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तसेच क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांचेशी चर्चा करून कार्यवाही केली.






वाघाचा व्हिडियो
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
CT-१ वाघाने डिसेंबर २०२१ पासून आतापर्यंत एकुण १३ लोकांचा बळी घेतल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये या वाघाबद्दल रोष निर्माण हांवून लोकप्रतिनिधी व्दारे त्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी होत होती. क्षेत्रीय स्तरावर गडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, वडसा उपवनसंरक्षक श्री. धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक वनसंरक्षक श्री. मनोज चव्हाण, श्री. धनंजय वायभासे, अविनाश मेश्राम, विजय धांडे, व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनीमागील ८ दिवसापासून अथक परिश्रम घेवून १३ नरबळी घेणाऱ्या CT -१ वाघाला जेरबंद करण्यात यश मिळविलेले आहे. याबद्दल श्री. महिप गुप्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी सर्व टिम चे अभिनंदन केले आहे. या यशामुळे वाघांच्या हल्ल्यात मनुष्य बळी कमी होईल अशी अपेक्षा जनमानसात झाली आहे. CT- १ वाघाला जेरबंद केले तरी वडसा व गडचिरोली वनविभागामध्ये इतर वाघांचा वावर असल्यामुळे लोकांनी जंगलात जाण्याचे टाळावे असे आवाहन डॉ. किशोर मानकर, व श्री. धर्मवीर सालविठ्ठल, यांनी केले आहे.





Post a Comment

Previous Post Next Post