सुरसुंडी येथील 24 वर्षे अविवाहित तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यु



एजाज पठाण प्रतिनिधि....

धानोरा : प्राप्त झालेल्या माहितीनुसार धानोरा तालुक्यातील मालेवाडा गावाजवळील सुरसुंडी या गावातील 24 वर्षीय तरुणाला हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाल्याची आज सायंकाळी 5.00 वाजता घटना घडली.


सदर अविवाहित मृतक तरुणाचे नाव युवराज नाजुकराव मोहुरले वय 24 वर्ष मु. सुरसुंडी असे आहे. युवराज हा सकाळी शेतावर गेला होता. शेतावरून तो घरी तीन वाजता आला नंतर जेवण करून झोपी गेला होता. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी सायंकाळी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु तो उठला नाही. झोपेतच त्याला हार्ट अटॅकचा आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तो खाटेवरच मरणाअवस्थेत पडून होता. अश्या अचानक घडलेल्या घटनेने मोहरले परिवारावर दुःखाचे संकट कोसळलेले आहे. अशा तरुण युवक निघुन जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

त्यांच्या आत्म्याला शांती लाभो!

Post a Comment

Previous Post Next Post