जागतिक बँकेचा अहवालाने शासक वर्गाच्या नीतीचे पितळ उघडे


देशात ५.६ कोटी नागरिक गरिबीच्या खाईत; कोरोना काळात बसला सर्वाधिक फटका
कोरोनामुळे २०२० मध्ये सर्व उद्योगधंदे बंद झाल्याने कोट्यवधी लोकांच्या नोकर्‍या गेल्या. यामुळे भारतातील तब्बल ५.६ कोटी नागरिक गरिबीच्या खाईत ओढले गेले, असे जागतिक बँकेने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे. या अहवालाने शासक वर्ग ब्राम्हणाच्या नीतीचे पितळ उघडे पडले आहे.


थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीचा हवाला जागतिक बँकेने यासाठी दिला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष अद्याप निश्चित झालेले नाहीत; परंतु जागतिक बँकेने ‘गरिबी आणि सर्वांची समृद्धी २०२२’ या शीर्षकाच्या अहवालात जगातील गरिबीचा अंदाज घेण्यासाठी या आकडेवारीचा वापर केला आहे. भारत गेल्या काही वर्षांत जागतिक आणि प्रादेशिक गरिबीच्या अंदाजांमधील अंतर भरण्यासाठी आवश्यक असणारा डेटा प्रकाशित करीत नसल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सादर केलेल्या अंदाजापेक्षा भारतात गरिबीचे प्रमाण अधिक आहे. ‘आयएमएफ’ने २०२० मध्ये २.३ कोटी भारतीय गरिबीत गेल्याचे म्हटले होते. राष्ट्रीय खात्यांवर आधारित असलेला आयएमएफचा अहवाल अर्थशास्त्रज्ञ सुरजित भल्ला, करण भसीन आणि अरविंद विरमानी यांनी लिहिला आहे. २०१८ मध्ये प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा देणारे भल्ला सध्या ‘आयएमएफ’मध्ये भारतासाठी कार्यकारी संचालक आहेत.
यापूर्वीच्या जागतिक बँकेच्या आधीच्या अंदाजानुसार २०१७ मध्ये भारतातील एकूण लोकसंख्येपैकी १०.४ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली होती. त्यांचा प्रतिदिन पगार केवळ १५५ रुपये (१.९ डॉलर) होता. ताज्या अहवालानुसार, २०१७ मध्ये देशातील १३.६ कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली म्हणजे गरिबीत जीवन जगत होते. कोरोनामुळे जगात अत्यंत गरिबीचा दर २०२० मध्ये अंदाजे ९.३ टक्क्यांपर्यंत वाढविला, जो २०१९ मध्ये ८.४ टक्के होता. २०११ पासून भारतात विशेषतः ग्रामीण भागात गरिबीत घट झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.



सन २०१९-२०मध्ये भारतातील १० टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जगत होती, असे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे. ग्रामीण भागात १२ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली राहतात, तर ६ टक्के शहरी लोक गरिबीत जीवन जगत होते. सरकारला गरजूंपर्यंत पोहोचणे कठीण झाले असल्याने कोरोनामुळे गरिबांची स्थिती आणखी बिकट झाली असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. केंद्र सरकार कोरोना काळात १५ टक्के ग्रामीण जनतेपर्यंत, तर ३१ टक्के जनतेपर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरले, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

सर्वाधिक गरीब कोण?
आफ्रिकन देश (सर्वांत गरीब) दक्षिण आशिया : भारत, पाकिस्तान, बांगलादेश ब्राझील, इंडोनेशिया

Post a Comment

Previous Post Next Post