देवाला (रावणाला) जाळण्याआधी... आम्हाला जाळा !

रावणदहणाचा कार्यक्रम थांबविला

चंद्रपूर :- रावण आमचा देव आहे. त्यांना जाळायचे असेल तर आधी आम्हाला जाळा अशी आक्रमक भूमिका गोंडपिपरीत आदिवासी युवती व महिलांनी घेतली. यानंतर काही काळासाठी वातावरण तापल. यानंतर रावण दहनाचा कार्यक्रम थांबविण्यात आला. दरम्यान ठाणेदार जीवन राजगूरू यांनी प्रभावी समन्वय साधत शांततेचा मार्ग काढला.

दसऱ्याच्या निमित्ताने गोंडपिपरी येथील गजानन कॉलेजच्या मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गोंडपिपरी येथील नागरिकांनी यासाठी जय्यत तयारी केली होती. गजानन कॉलेजच्या पटांगणावर रावणाची प्रतीकृती तयार करण्यात आली. गावातून रॅली काढीत लोक रावण दहनासाठी निघाले. दरम्यान रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्याची माहिती आदिवासी बांधवांना मिळाली. भाजपच्या नगरसेविका तथा युवा कार्यकर्त्या मनीषा मडावी, डॉ. सफल कोटनाके, निर्मला मडावी, उषा आलाम, सुरेखा मडावी, विजया मडावी यांच्यासह आदिवासी समाजातील तरुण मंडळी गजानन काँलेज परिसरात दाखल झाली. अन शेवटी रावनदहनाचा कार्यक्रम रदद करावा लागला. दरम्यान याप्रकारानंतर आदिवासी बांधवानी आदिवासी चौकात रावणाच्या पुजेचा कार्यक्रम पार पाडला.


कुप्रथा बंद करा

रावण आमचा देव आहे. आम्ही आमच्या देवाला जाळतांना चूप राहू शकत नाही. आमच्या पूर्वजांनी हे सहन केल असेल पण यापुढे ही कुप्रथा बंद व्हायला हवी - मनीषा मडावी नगरसेविका

Post a Comment

Previous Post Next Post